वाठार किरोली / वार्ताहर :
कोरोना आणि अतिवृष्टीमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना वाढीव खताच्या किंमतीने बेजार करून सोडले आहे. केंद्र सरकारने डीएपी वर अनुदानात वाढ करण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. त्या पाठोपाठ ‘इफको’ या प्रमुख खत कंपनीने खताच्या दरात कपात केलेली आहे. १०० रुपयांपासून ७०० रुपयांपर्यंत खताच्या किंमती कमी केलेल्या आहेत अशी माहिती इफकोचे आर जी मेंबर व कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक मनोहर बर्गे यांनी दिली.
इंडियन फारमर्स फर्टिलायझर्स को ऑप लि. (इफको) खताचे ५० किलो पोत्याचे दर एन पी के – १०.२६.२६ (११७५) रुपये, १२.३२.१६ (११८५) रुपये, एन पी एस २०.२०.००.१३ (९७५) रुपये डीएपी – (१२००) रुपये हे दर दिनांक २० मे २०२१ पासून लागू करण्यात आले आहेत. सर्व शेतकरी बांधवांना व विक्रेत्यांना कळविणेत येते की बाजारात उपलब्ध असलेल्या जास्त एम आर पी च्या छापील बॅगा सुध्दा वरील दराने विकण्यात येतील याची नोंद घ्यावी, असे आवाहन बर्गे यांनी केले आहे.