वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) एप्रिल ते जूनमध्ये आपल्या जवळपास 73.58 लाख ग्राहकांचे केवायसी डिटेल्स अपडेट केले आहेत. यामध्ये 52.12 लाख ग्राहकांचे आधार लिंक, 17.48 मोबाईल लिंक आणि 17.87 लाख जणांचे बँक खाते लिंक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यासोबतच ईपीएफओकडून लॉकडाऊनच्या कालावधीत केवायसी अपडेट केले आहेत. मागील 3 महिन्यात 9.37 लाख ग्राहकांची नावे, 4.18 लाख जन्म तारीख आणि 7.16 लाखजणांचे आधार नंबरमध्ये सुधारणा केल्याचे स्पष्ट केले आहे. पीएफ खातेधारकांना केवायसी अपटेड केल्यानंतर ईपीएफओच्या अंतर्गत ऑनलाईन पोर्टलचा वापर करुन केवायसी अपटेड करुन घेण्याची सोय आहे. यांच्यामदतीने युएएनच्या मदतीने आपला निधी काढण्यास सोपे होत असल्याची माहिती आहे.









