जपानमध्ये शेफला घरी स्वयंपाकासाठी बोलाविण्याचा प्रकार
जपानमध्ये कोरोना संक्रमण वाढत चालले आहे. संकटाची स्थिती पाहता सरकारने अनेक प्रांतांमध्ये लॉकडाउन लागू केले आहे. देशातील कोरोना संकटाचा फटका रेस्टॉरंट बिझनेसलाही बसला आहे. रेस्टॉरंटचे शेफर महामारीमुळे अनेक अडचणींना तोंड देत आहेत. याच्यावर तोडगा म्हणून आता ‘इन होम शेफ’ ही कल्पना लोकप्रिय होत आहे.
‘इन होम शेफ’ अंतर्गत तज्ञ आचारी (शेफ) लोकांच्या घरी जाऊन स्वयंपाक करतात आणि लोकांना रेस्टॉरंटसारख्या भोजनाचा आनंद घेता येतो. स्वयंपाक करणे कधीकधी सोपे असते आणि काहीवेळा नसते. कारण स्वयंपाकघर आणि सामग्रीमध्ये उपलब्ध वस्तूंवर स्थिती अवलंबून असते. याचबरोबर सामग्रीला मर्यादा असल्यास स्वयंपाक तयार करणे आव्हानच असते असे एका इन होम शेफने म्हटले आहे.
नोकरदार पालक देखील इन होम शेफ सेवेला अत्यंत उपयुक्त मानतात. ऑनलाईन सेवेचा वापर करून ऑर्डर देणे सोपे आहे, ज्यात शेफ तीन ते चार रात्रींसाठी सुमारे 70 डॉलर्स प्रति व्हिजिटच्या शुल्कावर स्वयंपाक करतो. यात भोजनासाठीचा खर्च सामील नसतो.
घरी शेफद्वारे आमच्यासाठी स्वयंपाक तयार करणे खूपच मदतीचे असते आणि हे अत्यंत स्वादिष्ट देखील असते. शेफ माझ्या घरी स्वयंपाक करताना मी हेअर सलूनमध्ये जाऊ शकतो किंवा मुलांसोबत खेळू शकतो. स्वयंपाक झाल्यावर शेफ प्रत्येक डिशबद्दल माहिती देतात असे एका ग्राहकाने सांगितले आहे.
पूर्वी हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये काम करायचो. तेथे ग्राहक मला ओळखायचे. पण आता प्रत्येक कुटुंबासाठी वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करावे लागतात आणि हे आव्हानात्मक असल्याचे एका शेफने म्हटले आहे. देशात कोरोनामुळे अनेक प्रतांमधीर रेस्टॉरंट पूर्वीप्रमाणे पूर्णवेळ खुली नसतात, याचमुळे बहुतांश शेफनी लोकांच्या घरी जात स्वयंपाक तयार करण्याची कल्पना स्वीकारली आहे.









