वृत्तसंस्था /मुंबई :
सकारात्मक जागतिक आणि स्थानिक संकेताच्या दरम्यान इन्फोसिसच्या समभागातील तेजीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने सोमवारी विक्रमी पातळी गाठली. मुंबई शेअर बाजारातील 30 समभागाचा सेन्सेक्स 259.97 अंकांच्या तेजीने वधारत 41859.69 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 72.75 अंकांनी वधारून 12329.55 अंकांच्या विक्रमी स्तरावर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीच्या तेजीत त्यांच्या समभागाचे विशेष योगदान मिळाले.
इन्फोसिसचा डिसेंबर तिमाहीतील निव्वळ नफा 23.7 टक्क्यांनी वाढत 4466 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कंपनीकडून याचे परिणाम शुक्रवारी दर्शविण्यात आले होते. सेन्सेक्सच्या इतर कंपन्यांमध्ये इन्डसइन्ड बँक, भारती एअरटेल, हिंदुस्तान यूनिलीव्हर, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, पॉवर ग्रीड कॉर्प आणि टेक महिंद्राचे समभाग तेजीत होते. तर दुसऱयाबाजुला टीसीएल, एसबीआय, बजाज ऑटो, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, ऍक्सिस बँक आणि नेस्ले इंडियाच्या समभागात घसरण झाली.
इन्फोसिसच्या तिमाही परिणामांव्यतिरिक्त सकारात्मक आकडेवारी आणि मजबूत जागतिक दृष्टीकोन यामुळे बाजाराला चालणा मिळाली. सलग तीन महिने घसरणीनंतर नोव्हेंबरमध्ये इंडस्ट्रियल प्रॉडक्शन (आयआयपी) 1.8 टक्क्यांनी वाढला आहे. उत्पादन क्षेत्राच्या जोरदार प्रदर्शनामुळे आयआयपी सकारात्मकेत आला आहे. दरम्यान, आयआयपीचे आकडे शुक्रवारी बाजार बंद होण्यावेळी समोर आले होते.
चीनचा शंघाई, हाँगकाँगचा हँगसँग आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी बाजार तेजी होता. सुरुवातीला व्यापारात यूरोपीय बाजार मजबुतीत होते. ब्रेंट कच्च्या तेलाचा दर 0.37 टक्क्यांनी वाढून 65.22 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला. तर आंतर बँक विदेशी चलन बाजाराच्या दरम्यान, रुपया 12 पैसे वधारासह 70.82 टक्के डॉलरवर होता.







