विविध प्रकारच्या साडय़ांसह दागिन्यांचीही विक्री
प्रतिनिधी /बेळगाव
येथील हॉटेल युके-27 मध्ये भरविण्यात आलेल्या इन्प्रेशन्झ या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी सकाळी नंदगुडी ऑईल्सच्या अनुरिटा कुणाल व श्रुती निखिल कत्ती यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी इप्रेशन्झच्या संचालिका कृपा सुमंथ यांनी सर्वांचे स्वागत करून प्रदर्शनाची माहिती दिली. प्रदर्शनात देशाच्या वेगवेगळय़ा भागातून उत्तम दर्जाच्या डिझायनर व पारंपरिक साडय़ांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. दक्षिण भारतातील नामवंत डिझायनर्सनी आपली निर्मिती येथे सादर केली आहे. जॉर्जेट, बनारस सिल्क, एम्ब्रायडरी, ऑर्गेन्झा व इतर सर्व प्रकारच्या तसेच नऊवारी साडय़ा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
दैनंदिन पोषाखांपासून वधूच्या दागिन्यांपर्यंत विविध प्रकार महिलांच्या पसंतीस उतरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रदर्शनातील डेस मटेरियल व दागिन्यांचे प्रकार शहरातील महिलांच्या पसंतीस उतरतील, असेही त्या म्हणाल्या.









