प्रतिनिधी /बेळगाव
इनरव्हील क्लब ऑफ बेळगावने ‘वंचितांसाठी आरोग्यसेवा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत क्लबच्या सदस्यांनी दि. 14 रोजी पहाटे बाळेकुंद्री व माविनकट्टी या ग्रामीण भागात जाऊन 80 महिलांना ब्लॅंकेट्स वितरित केले. या महिला मेंढीपालन व्यवसाय किंवा शेतात काम करतात. आर्थिकदृष्टय़ा त्या दुर्बल असून त्यांच्यासाठी क्लबने हा उपक्रम हाती घेतला आहे. या प्रसंगी क्लबच्या अध्यक्षा डॉ. सुषमा शेट्टी, सचिव सविता कद्दु, माजी अध्यक्षा लता कित्तूर यांच्यासह अन्य सदस्या उपस्थित होत्या. या शिवाय निराधार आणि अनाथांनासुद्धा ब्लँकेट्सचे वितरण करण्यात आले.









