वृत्तसंस्था/ बार्सिलोना
इथिओपियाचे धावपटू बेरीहू ऍरेगेव्ही तसेच इजेगेयु ताये यांनी 2021 च्या ऍथेटिक्स हंगामाच्याअखेर बार्सिलोनामध्ये झालेल्या स्पर्धेत पाच कि.मी. धावण्याच्या शर्यतीत नवे विश्वविक्रम नोंदविले.
बार्सिलोनात झालेल्या शर्यतीमध्ये पुरूष विभागात इथिओपियाच्या 20 वर्षीय ऍरेगेव्हीने 5 कि.मी. पल्ल्याच्या शर्यतीमध्ये 12 मिनिटे, 49 सेकंदाचा अवधी घेत नवा विश्वविक्रम करताना गेल्या महिन्यात लिली येथे झालेल्या स्पर्धेत युगांडाच्या चेपतेगीने नोंदविलेला विश्व़विक्रम मोडीत काढला. महिलांच्या विभागात इथिओपियाच्या तायेने 14 मिनिटे, 19 सेकंदाचा अवधी घेत नवा विश्वविक्रम नोंदविला. 21 वर्षीय तायेने स्वीडनच्या मेराफ बेहताने या शर्यतीत दुसरे स्थान मिळविले.









