वृत्तसंस्था/ रोम (इटली)
येथे सुरू झालेल्या एटीपी टूरवरील इटालियन खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतून स्पेनचा कार्लोस अलकॅरेझने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. अलकॅरेझने गेल्या आठवडय़ात माद्रीद मास्टर्स 1000 टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले होते.
मानांकनात सहाव्या स्थानावरील अलकॅरेझच्या उजव्या घोटय़ाला दुखापत झाली असून ती पूर्णपणे बरी झाली नसल्याने त्याने इटालियन स्पर्धेतून माघार घेतल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले. गेल्या आठवडय़ात अलकॅरेझने माद्रीद टेनिस स्पर्धा जिंकताना अंतिम सामन्यात जर्मनीच्या व्हेरेव्हचा पराभव केला होता. या स्पर्धेत 19 वर्षीय अलकॅरेझने स्पेनच्या माजी टॉप सीडेड राफेल नदाल आणि सर्बियाच्या माजी टॉप सीडेड जोकोविचला पराभूत केले होते. जपानच्या नाओमी ओसाका इटालियन टेनिस स्पर्धेतून यापूर्वी दुखापतीमुळे माघार घेतली आहे.









