ऑनलाईन टीम / रोम :
इटलीत आतापर्यंत 29 लाख 99 हजार 119 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 98 हजार 974 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
गुरुवारी या देशात 22 हजार 865 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 339 जणांचा मृत्यू झाला. 29.99 लाख रुग्णांपैकी 24 लाख 53 हजार 706 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 4 लाख 46 हजार 439 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 2475 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत इटली जगात आठव्या क्रमांकावर आहे. येथे आतापर्यंत 4 कोटी 13 लाख 38 हजार 022 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.









