वृत्तसंस्था/ व्हिएन्ना
एटीपी टूरवरील ऑस्ट्रीयात सुरू असलेल्या व्हिएन्ना खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीच्या लोरेंजो सोनेगोने सर्बियाच्या टॉप सीडेड नोव्हॅक जोकोव्हिचला पराभवाचा अनपेक्षित धक्का दिला.
या स्पर्धतील शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इटलीच्या 42 व्या मानांकित सोनेगोने जोकोव्हिचचा 6-2, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत पुढील फेरी गाठली. या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात ऑस्ट्रीयाचा माजी विजेता थिएम यालाही पराभव पत्करावा लागला. रशियाच्या रूबलेव्हने थिएमचा 7-6 (7-5), 6-2 त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेच्या अँडरसनने रशियाच्या मेदव्हेदेवचा 6-4, 7-6 (7-5) असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.









