वृत्तसंस्था/ रोम
उत्तेजक चांचणीत दोषी ठरलेला इटलीचा 37 वर्षीय सायकलपटू रिकार्दो रिको याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. 2008 साली टूर डी फ्रान्स सायकलींग स्पर्धेत सहभागी होताना रिकोने उत्तेजक घेतल्याचे आढळून आले होते.
इटलीच्या रिकोवर यापूर्वीच 12 वर्षांच्या बंदीच्या कालावधीला प्रारंभ करण्यात आला होता. बंदीचा हा कालावधी 2024 साली संपणार होता. उत्तेजक चांचणीत दोषी आढळल्याने रिकोला 4850 डॉलर्सचा दंडही करण्यात आला होता. सोमवारी क्रीडा लवादासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणीनंतर रिकोवर आजीवन बंदीचा निर्णय जाहीर केला.









