नवी दिल्ली
स्टार्टअप कंपनी ‘इझी पे’ला आपले उत्पन्न आर्थिक वर्ष 2022 पर्यंत 100 दशलक्ष डॉलरपर्यंत वाढवायचे आहे. अहमदाबादच्या या स्टार्टअप कंपनीला आर्थिक वर्ष 2022 पर्यंत आपला महसूल सुमारे 730 कोटी रुपयांपर्यंत पोहोचवायचा आहे. व्यापाराच्याबाबतीत गेल्या काही काळात इझी पेचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढलेला आहे. या वषी मार्चमध्ये कंपनीने ‘पैसा निकाल’ ही योजना टायर टू आणि टायर तीन शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागांमध्ये राबवली होती. याचा अनेक रिटेलर व्यावसायिकांना फायदा झाला. ग्रामीण भागांमध्ये एटीएमची संख्या कमी असल्याने काही वेळेला पैसे मिळवणे अवघड जात होते, अशांना इझी पे डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून संबंधितांना पैसे सुपूर्द करते.









