कैरो
इजिप्तचा टेनिसपटू युसेफ होसाम मॅचफिक्सिंग प्रकरणात तसेच इतर काही प्रकरणात आर्थिक भ्रष्टाचार केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर टेनिस इंटीग्रेटी युनिटने (आयटीयूने) आजीवन बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे. टेनिस क्षेत्रातील बऱयाच सामन्यामध्ये होसामकडून मँचफिक्सिंग केल्याचे आढळून आले आहे. टेनिस संघटनेच्या तपास पथकाकडून अनेक प्रकरणांची चौकशी करण्यात आली. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने होसामवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. एटीपी मानांकनात तो 820 व्या स्थानावर आहे.
युसेफ याचा मोठा भाऊ करीम होसाम याच्याकडूनही मँचफिक्सिंग गुन्हा घडल्याने 2018 साली त्याच्यावरही आजीवन बंदी घालण्यात आली होती.









