मूळगावी जाण्यासाठी प्रशासनाकडे मदतीची याचना
प्रतिनिधी/इचलकरंजी
मुळगावी जाण्यासाठी प्रशासनानने मदत करावी या मागणीसाठी इचलकरंजी येथील सांगली रोडवर आज, मंगळवारी (दि-१२) परप्रांतीय कामगार रस्त्यावर उतरले. एकाच वेळी शेकडोच्या संख्येने कामगार रस्त्यावर आल्याने परिसरात खळबळ उडाली. पण पोलीस व कामगार आयुक्तांनी समजूत काढल्यानंतर हे कामगार परत गेले.
सांगली रोडवर असलेल्या गजानन महाराज मंदिराजवळ मंगळवारी सकाळी सुमारे पाचशेहून अधिक परप्रांतीय कामगार जमा होवून रस्त्यावर आले. शहरातील कारखाने बंद असल्याने हाताला काम नाही, त्यामुळे हाल होत असल्याने मुळगावी परत पाठवण्याची त्यांनी मागणी केली. याची माहिती मिळताच शहापूर पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्याचवेळी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारीही तेथे आले. त्यांनी उपस्थितांची समजूत काढत प्रशासकीय पातळीवर लवकरात लवकर याबाबत निर्णय होणार असल्याचे सांगितले. यानंतर हे कामगार त्यांच्या घरी परतले. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








