प्रतिनिधी / इचलकरंजी
लॉकडाऊन काळातील संचारबंदी व जमावबंदी आदेश धुडकावून शहरातील विविध भागात मॉर्निंग वॉक घेणाऱ्या ७५ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, या कारवाईमध्ये उच्च शिक्षित व प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादार यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, गावभागचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार व निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पाटील यांच्या पथकाने केली. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी कारवाई केली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. संचारबंदी व जमावबंदीचा आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. मात्र हा आदेश धुडकावत शहरात अनेकजण मॉर्निंग वॉकसाठी बाहेर रस्त्यावर फिरत आहेत. शहरातील सांगली नाका परिसर, पोटफाडी चौक, कबनूर हायस्कूल, अलायन्स हॉस्पिटल, दर्गा चौक कबनुर आदी ठिकाणी पोलिसांनी सकाळी ७ ते ८ या दरम्यान कारवाई केली. यात शिवाजीनगर ५३ तर गावभाग पोलिसांत २२ असे एकूण जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी कारवाई करण्यात आलेल्या डॉक्टरांना कोरोनाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यास सांगितले. तर दररोज सकाळी ही कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादार यांनी केले.
मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्यांची नावे :
आनंदा सोनाजी जाधव (वय ५२, रा. सहकारनगर), संजय भिमराव बिराजदार (वय ४९, रा. शहापूर), अशोक दत्तात्रय मुंडे (वय ४८, रा. विक्रमनगर, आरगे मळा), शशिकांत तायाप्पा वडर (वय २४, रा. यड्राव फाटा), सुरज जोतीराम पाटील (वय २३, रा. तोरणानगर), विवेकानंद प्रभाकर काबंळे (वय ४०, रा. लाखेनगर), अमर मधुकर दबडे (वय ३८, रा. शांतीनगर), संजय लहू दुर्गे (वय ३५, रा. सहकारनगर), अनिकेत आनंद फडके (वय २३, रा. पाटील मळा), दयानंद शिवलींग स्वामी (वय ४२, रा. सागंली नाका), शंभूनाथ सुधाकर डाके (वय २१, रा. सुतार मळा), राजू भिवाजी माने (वय २६, रा. गावभाग), मलकारी भिमराव नंदनवाडी (वय २८, रा. पाटील मळा), श्रेणीक मणीकांत शहा (वय ४५, रा. गावभाग), निवृत्ती तुकाराम आमणे (वय ३८, रा. संभाजी चौक), दिलीप मधुकर म्हाकवेकर (वय ४९, रा. रसना कॉर्नर), सोहेल सरदार पटेल (वय २४), आफताब समिर मुल्ला (वय २०), अरबाज अमिर मुजावर (वय २१, तिघेही रा. गावभाग झेंडा चौक), इम्रान सलिम शेख (वय २१, रा. नदीवेस नाका), जयसिंग दत्तात्रय पोवार (वय ४८), दत्तात्रय मारूती खोत (वय ३५, दोघे रा. मंगळवार पेठ) यांच्याविरोधात गावभाग पोलिसात पोलीस नाईक आरिफ दस्तगीर वडगावे यांनी तक्रार दिली आहे. तसेच प्रशांत अशोक मोरे (वय ३५, रा . चंदुर) संदिप केरबा गुरव (वय ३९, रा. भोनेमाळ), प्रमोद बाळासाहेब शिंदे (वय ३७, रा. किसन चौक, सुर्वेनगर), दयासागर विभुती नारायणसींग (वय ६२), राकेश बहादुर सिंग (वय ५६, दोघे रा. जामदार मळा), इस्ताक हौसल खान (वय ४६, रा. योगायोग नगर), शिवाजी विष्णु खातुडे (वय ६३, रा. गोंधळी गल्ली), वामन गजानन तेरवाडकर (वय ५०, रा. विवेकानंद कॉलनी), राजु अस्मद जगवानी (वय ४२, रा. यशवंत प्रोसेस जवळ), संगम नारायण अग्रवाल (वय ४८, रा. जुनी नगरपरिषदजवळ), सुदर्शन शिवाजी आरणे (वय ४०, रा. मुक्त सैनिक सोसायटी), अक्षय हिंदुराव राणे (वय २४, रा. कल्लेश्वर मंदिरजवळ, कबनुर), पृथ्वीराज श्याम बेलेकर (वय २२, रा. भाग्यरेखा टॉकीजवळ), संजीव गणेश सोनकरपल्ले (वय ३०, रा. लालनगर), रोहन रियाज मुजावर (वय २१, रा. डॉ. ढवळे हॉस्पीटलजवळ), रफीक नुरमहमद सय्यद (वय ३८, रा. शाहुनगर, चंदुर), खलीफ अहमद राजबहादुर खान (वय ५०, रा. अलायन्स हॉस्पीटल समोर), सुरज श्रीकांत मोरे (वय २८, रा. जवाहर नगर), मोहसीन राजुद्दीन सलादे (वय ३४, रा. यशवंत कॉलनी), कैलास काकासो पाटील (वय २८, रा. लिगाडे मळा), सीताराम पांडुरंग लवटे (वय ३५, रा. सातपुते गल्ली), अगम राज बोहरा (वय ५९, रा. डॉ. साखरपे हॉस्पीटलजवळ), संतोश रवी चौधरी (वय ३४, रा. राजराजेश्वरी नगर), अरविंद विश्वनाथ चौरासिया (वय ३५, रा. गांधी विकासनगर), बसु लमन्ना मादर (वय २५, रा. आवळे गल्ली), यशराज योगेश वाठारे (वय २१, रा. झेंडा चौक), अमरेश बरमा चौधरी (वय २६, रा. पुजारी मळा), अजित अप्पु लनगर (वय २७, रा. तांबे मळा) यांच्याविरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप चंद्रकांत कोळी यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली आहे.
तर धनराज नरेश चौधरी (वय ३५, रा. पुजारी मळा), राहुल बाबासाहेब कोळी (वय ३०, रा. अवधूत आखाडा), तेजकुमार सिद्राम नल्ला (वय ३९, रा. लालनगर), गजेंद्र कुमार सिंग (वय ३६, रा. स्वामी मळा), शिवाजी लक्ष्मण चव्हाण (वय ५०, रा. शाहुनगर, चंदुर), परशुराम राजू माळी (वय ३३, रा. गोसावी गल्ली), इस्माईल बाबसो खानापूरे (वय ५०, रा. षट्कोन चौक), विवेकानंद बाळकृष्ण रावळ (वय ६०, रा. स्वामी मळा), रमेश दिनकर पाटील (वय ४०, रा. मुक्त सैनिक हौसिंग सोसायटी), अजय उदय बुचडे (वय २२, रा. योगायोगनगर), संतोष कुमार सिंग (वय ३०, रा. यशवंत कॉलनी), विकास कुमार (वय १८, रा. यशवंत कॉलनी), यश सुनिल बुचडे (वय १९, रा. दत्तनगर, शहापूर), शामराव आनंदराव परीट (वय ५५, रा. इरगोंडा पाटीलनगर , कबनूर), संतोष शंकरलाल गुप्ता (वय ४६, रा. गणेशनगर), संतोष सदाशिव चौगले (वय ३४, रा. राजराजेश्वरीनगर), राजू धुळाप्पा पोवार (वय ४०, रा. भोनमाळ), हरिष लक्ष्मण पाटील (वय ३०), अश्विन अशोक पाटील (वय २५, दोघेही रा. इंदिरा कॉलनी), राजू महादेव गोंडपाल (वय ३१, रा. कबनूर), अजित प्रकाश एकार (वय ४३, रा. डेक्कन चौक), सुनिल धोंडीरम लोहार (वय ३५, रा. कबनुर), अमरिजदिप नारायण सिंग (वय ३९, रा. गांधी विकासनगर), विनोद लालताप्रसाद शर्मा (वय ४८, रा. कोल्हापूर नाका), संतोष सुरेश सुरंगे (वय २०, रा. तिरंगा कॉलनी) यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिसांत पोलीस कॉन्स्टेबल सागर शिवाजी रानगे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
Previous Articleदेशात गेल्या 24 तासात 549 रुग्णांची भर
Next Article म्हापशात पोलीस खात्यातर्फे कोरोना जनजागृती गीत सादर








