प्रतिनिधी / इचलकरंजी
येथील एका माजी नगरसेवकासह सहाजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सायंकाळी निष्पन्न झाले. काही दिवसांपूर्वी बाधीत माजी नगरसेवक हा सनियंत्रण समितीच्या बैठकीस उपस्थित राहिला होता. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
इचलकरंजीत समूह संसर्गाची साखळी सलग १६ व्या दिवशीही अखंडित राहिली. गुरुवार ९ जुलै रोजी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार बंडगर माळ येथे राहणाऱ्या ५५ वर्षीय एका माजी नगरसेवकासह सहा जण कोरोनाबाधीत झाल्याचे निष्पन्न झाल्याचे स्पष्ट झाले. हा माजी नगरसेवक एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. सोमवार ६ जुलै रोजी लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेण्यासाठी सनियंत्रण समितीने बोलावलेल्या बैठकीत बाधीत माजी नगरसेवक उपस्थित होता. या बैठकीस नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, पोलिस अधिकारी व पालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने तेथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले होते. त्यातच आज या माजी नगरसेवकाचा खाजगी लॅबमध्ये तपासलेला अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, गुरुवारी तीन बत्ती चौक परिसरातील ३० वर्षीय, सातपुते गल्लीतील ४९ वर्षीय पुरुष, तसेच लंगोटे मळा येथील ३१ व २७ वर्षीय दोन युवक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे शहरातील कोरोनाबधितांची ९३ वर पोहचली आहे. हे दोन्हीही युवक बुधवारी मयत कोरोनाने मयत झालेल्या रुग्णाचे जवळचे नातेवाईक आहेत. तसेच बेपारी गल्लीतील मटण विक्री करणारी ३३ वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








