प्रतिनिधी / इचलकरंजी
येथील कुडचे मळा परिसरातील कोरोनाबाधीत रुग्णाच्या शेजारील महिला व कारखान्यातील सहकारी यंत्रमाग कामगार या दोघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. गुरुवारी रात्री उशिरा दोन ही अहवाल प्राप्त झाले. यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४ वर पोहोचली आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील कुडचे मळा परिसरात मंगळवारी ५५ वर्षीय यंत्रमाग कामगाराला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर बुधवार २४ जून रोजी त्याचा मुलगा व नात यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा या कोरोना बाधिताच्या घरा शेजारी राहणारी व त्या च कारखान्यात कांड्या भरण्याचे काम करणाऱ्या ५५ वर्षीय महिला व साखरपे हॉस्पिटल मागे राहणारा ४४ वर्षीय सहकारी यंत्रमाग कामगार यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. याचबरोबर दातार मला येथील वयोवृद्धांच्या शासकीय कोरोना तपासणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. कुडचे मळा परिसरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ झाली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








