इचलकरंजी / प्रतिनिधी
येथील वेताळ पेठेमध्ये ड्राय डे दिवशी अवैधपणे सुरु असलेल्या ओबी बीअर बार अॅण्ड परमीट रुमवर पोलिसांनी छापा टाकला. या बारमधून पोलिसांनी वकील सुपुत्र असलेल्या बार मालकासह आठ जणाना अटक केली. त्याच्याकडून एक तलवार, जॉबीया आणि 68 हजार 580 रुपयाची रोकड व सुमारे 60 हजाराची बीअर आणि विदेशी दारु असा 1 लाख 28 हजार 580 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
बार मालक व वकील सुपुत्र ओमकार अरविद बडवे(वय ३३, रा. वेताळ पेठ) व्यवस्थापक उद्धव शिवाजी निकम ( वय २१, रा. सरस्वती मार्केट), संदीप संजय पाटील (वय २८, रिग रांड, महासता चौक), शाहरुख जबार समडोळे ( वय ३१, रा. मंगळवार पेठ), राहुल राजाराम कांबळे (वय २५, रा. खंजीरे अपार्टमेंट, इचलकरंजी), हणमंत रामचंद्र वाळवेकर (वय ५०, रा. कलानगर, इचलकरंजी), संपत गंगाधर शिंगाडे (वय ४०, रा. वेताळ पेठ), अमित तानाजी लंगारे ( वय ३१, रा. वेताळ पेठ) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. ही कारवाई पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी आणि गावभाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी केली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कुडवे, कॉन्स्टेबलआरिफ वडगावे, बबन माळी, विक्रम शिंदे, अमोल खोत, सचिन मगदूम, एम. वाय. पाटील आदीने सहभाग घेतला.
महात्मा गांधी पुण्यतिथी शनिवारी होती. यावेळी शासनाने ड्राय डे जाहिर केला होता. तरीदेखील येथील वेताळ पेठेमध्ये ओबी बीअर बार अॅण्ड परमीट रुम अवैधपणे सुरु ठेवले होते. यांची माहिती मिळताच या बीअर बारवर पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकला. बार मालक आणि वकील सुपुत्रासह आठ जणाना अटक केली. त्याच्याकडून एक तलवार, जॉबीया आणि 68 हजार 580 रुपयाची रोकड व सुमारे 60 हजाराची बीअर आणि विदेशी दारु असा 1 लाख 28 हजार 580 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.









