इचलकरंजी : आज सातजण कोरोना पॉझिटिव्ह
प्रतिनिधी / इचलकरंजी
येथे रविवारी आणखी सात जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सलग तेराव्या दिवशीही कोरोनाची साखळी कायम राहिली. यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या ६७ वर पोहोचली आहे. शहरातील सर्वच भागात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडत असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.
रविवार ५ रोजी शहरातील ७ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील एका बँकेत काम करणारा गावभागातील २८ वर्षीय व महाराणा प्रताप चौक येथील ५३ वर्षीय कर्मचाऱ्याचा समावेश आहे. त्याचबरोबर हत्ती चौक येथे राहणाऱ्या खासगी डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांचा दवाखाना भोने माळ येथे आहे. तसेच राजकीय व्यक्तिच्या कोरोना पॉझिटीव्ह मुलाच्या संपर्कात आलेल्या रिंग रोड येथे राहणाऱ्या माजी नगरसेविकेच्या पुत्राचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर सोडगे मळा येथील एका ३७ वर्षीय महिला व लिंबू चौकातील ५२ व २० वर्षीय पिता-पुत्राचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
शहरात कुडचे मळा येथे समुह संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर शहरात सर्व भागात याचे लोण पसरले आहे. सलग १३ व्या दिवशी ही चेन तुटली नसल्याचे समोर आले. रविवारी ७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधितांची संख्या ६७ वर पोहोचली आहे. शहरातील सर्वच भागात कोरोनाचे रूग्ण सापडत असल्याने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








