इचलकंरजी / प्रतिनिधी
इचलकरंजीतीली नगरपालिकेच्या जुन्या इमारती समोरील रस्त्यावरील तीन मजली इमारतीला सोमवारी रात्री सातच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीत संबंधित घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. आगीची माहिती समजताच इलकरंजी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे तीन पाण्याचे बंब त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.
आग लागलेल्या घराला 15 दिवसांपूर्वीच शॉर्टसर्किटने आग लागली होती. ती आग नगरपालिकेच्या अग्निशमन जवानांनी त्वरीत आटोक्यात आणली होती. त्यानंतर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इमारत मालकाला संपूर्ण इलेक्ट्रीक वायरिंग बदलण्यास सांगितले होते. मात्र, त्याने याकडे दूर्लक्ष केले. त्यामुळे पुन्हा आगीची दूर्घटना घडल्याची घटनास्थळी चर्चा सुरू होती. तसेच रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनच्या गाड्यांनी पाण्याच्या सहा खेपा केल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Previous Articleसोलापूर : बंद दुकानचे शटर तोडून ३२ हजार लंपास
Next Article सणासाठी दुकाने उघडण्यासाठी परवानगी मिळावी









