इचलकरंजी / प्रतिनिधी
येथील आयोध्यानगरातील वड मारुती मंदिरालगत राहणाऱ्या मोठ्या कापड व्यापाऱ्याने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
रामरतन डोंगीवाल (वय 38 ) असे त्या व्यापाऱ्यांचे नाव आहे. त्याच्या मृतदेहाशेजारी पोलीसांना वेगवेगळा चार सुसाईड मिळून आल्या. यामध्ये एक वडीलाच्या नावे, एक पत्नीच्या नावे तर दोन पोलीसांच्या नावे सुसाईड लिहिल्या आहे.
एका सुसाईड नोटसमध्ये शहरातील ओझा नामक एका महिलेने १० लाखाला फसविल्याबाबत उल्लेख करण्यात आला आहे. तसेच ही संबंधीत महिला शहरातील मोक्याच्या गुन्हात सध्या पसार असलेल्या पोलीस रेकॉर्डवरील नामचिन गुंडाच्या नावाचा करीत होती, असे घटनास्थळी बोलले जात होते. अशी माहिती पोलिसांनी दिली.
मृत रामरतन हे शनिवारी सकाळी घरच्यांना कामानिमित्याने बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले. त्यांनी घरच्यांची नजर चुकवून राहत्या बंगल्यातील वरच्या मजलावरील स्टोअर रूममध्ये गेले. तेथेच दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. शनिवारी रात्री घरचे लोक बंगल्यातील वरच्या मजलावरील स्टोअर रूममध्ये गेले असता त्यांना रामरतन यांनी दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्वरीत घटनास्थळी आले. त्याना घटनास्थळाचा पंचनामा करताना मृत रामरतन यांच्या खिशात चार वेगवेगळ्या चार सुसाईड नोट सापडल्या. तसेच विषारी औषधाची एक बाटली सापडली आहे. त्यामुळे रामरतनने गळफास घेण्यापूर्वी विष प्राशन केले असण्याची शक्यता ही पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









