म्होरक्या पसार मालकासह चौघे अटक
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथील बालाजी कॉलनी मधील एका गोडाऊनमध्ये सुगंधी तंबाखू आणि सुगंधी तंबाखू बनवण्यासाठी लागणारे केमिकलचा साठा करून ठेवलेल्या या गोडाऊनवर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी छापा टाकला. याप्रकरणी चार जणांना अटक केली. तर या अवैध सुगंधी तंबाखू प्रकरणाचा तस्कर पसार झाला आहे. तर पोलिसांनी या चौघांच्याकडून सुमारे १ लाख ९८ हजार रुपये किंमतीचा सुगंधी तंबाखूची २२ पोती व सुमारे ६ लाख ६० हजार रुपये किंमतीचा सुगंधी तंबाखू बनविण्यासाठी लागणारे केमिकल असा ८ लाख ५८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.
पसार तस्कराचे उदय महादेव वाळवेकर (रा नागाळा पार्क कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. तर अटक केलेल्यांच्यामध्ये गोडाऊन मालक सदाशिव महादेव वाळवेकर, ( मूळ राहणार नागाळा पार्क कोल्हापूर, सध्या रा . इचलकरंजी ), संतोष श्रीकांत भीलुगडे (रा धान्य गल्ली इचलकरंजी), सुदाम श्रीकांत टकले, (रा विकास नगर इचलकरंजी), सुरज राजेंद्र मुदगल (रा सहकार नगर इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई कोल्हापूर व इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली. याबाबत रात्री उशिरा गावभाग पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
सहायक पोलिस निरीक्षक जाधव म्हणाले, शहरातील सांगली रोड लगत असलेल्या बालाजी कॉलनीत एका गोडाऊनमध्ये बेकायदेशीर पणे सुगंधि तंबाखू तयार करण्यासाठी लागणारे केमिकलचासाठा करण्यात आला आहे. अशी माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार विजय कारंडे याना बातमी दारा मार्फत समजले. त्यावरून कोल्हापूर व इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांचे एक पथक तयार केले त्या पथकाने शनिवारी सायंकाळी संबधित गोडावूनवर छापा टाकला त्यावेळी गोडाऊन मालकासह चौघेजन मिळून आले. तसेच त्यांच्याकडे सुमारे १ लाख ९८ हजार रुपये किंमतीचा सुगंधी तंबाखू व सुमारे ६ लाख ६० हजार रुपये किंमतीचा सुगंधी तंबाखू तयार करण्यासाठी लागणारे केमिकल असा ८ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.
या कारवाईमध्ये इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार विजय कारंडे, कॉन्स्टेबल किरण गावडे, तुकाराम राजगिरे, बबलू शिंदे आदींनी घेतला.









