इचलकरंजी / प्रतिनिधी
कोरोना लॉकडाऊनचे उल्लंघन करून अवैध पणे सुरु केलेल्या शहरातील स्टेशन रोडवरील हॉटेल कॅबसनवर पोलिसांनी सोमवारी रात्री छापा टाकला. या छाप्यात हॉटेल मालक, 2 मद्यपी युवतींसह 22 मद्यपींना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक बी बी महामुनी यांच्या पथकाने केली
वाढत्या कोरोनाच्या संसर्गाचा पार्श्वभूमीवर सरकारने काही नवीन निर्बंध लागू केले आहेत. तरी देखील त्या निर्बंधांचे उल्लंघन करीत स्टेशन रोडवरील हॉटेल कॅबसन मधील बिअर बार आणि परमिट रूम खुलेआम सुरू होते. मद्यपींना बार मध्ये बसवून हा सगळा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक महामुनी यांना मिळाली. यावरून पोलीस उपअधीक्षक महामुनी यांनी या हॉटेल व बारवर सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला.
त्यावेळी पोलिसांना हॉटेलच्या टेरेसवर मद्यपान करीत असलेल्या 2 युवतींसह 22 युवक आढळले. त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच हॉटेलच्या 3 मालकांसह मॅनेजरला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा शिवाजी नगर पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
Previous Articleकोल्हापुरात जमावाचा कुटुंबावर सशस्त्र हल्ला; 10 जखमी (video)
Next Article मामि अध्यक्षपदाचा दीपिकाने दिला राजीनामा









