प्रतिनिधी / इचलकरंजी
इचलकरंजीतील मंगळवार पेठेमधील शुभम दिपक उर्फ दिगंबर कुडाळकर (वय 26, रा. मंगळवार पेठ, इचलकरंजी) यांच्या खून प्रकरणी तिघा संशयीतांना ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले. या तिघांपैकी एक मित्र दोघे जवळचेच पाहुणे असून, तपासाच्या नावाखाली त्यांची नावे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. तसेच हा खून`प्रेमप्रकरणातून’ झाल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
मृत शुभम कुडाळकर यांचा धार-धार कोयत्याने शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शहापूर (ता. हातकणंगले) येथील विशाल विद्यालयासमोर मोकळ्या पटागंणामध्ये निघृणपणे खून करण्यात आला होता. पोलिसांनी या खूनाच्या घटनेचा अवघ्या अकरा तासाच्या कालावधीमध्ये छडा लावून, खूनातील मारेकर्यांचा शोध लावण्यास यश मिळविले. शनिवारी पहाटे शुभमचा खून हा तिघा संशयीतांनी प्रेमप्रकरणातून केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली. तसेच या तिघांमध्ये एक मृत शुभमचे मित्र दोघे जवळचे पाहुणे असलेल्या युवकाचा समावेश असल्याची माहिती पुढे आली.
त्यावरुन पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी यांचे कार्यालयीन पथक, इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांच्या बरोबर शहापूर, गावभाग, शिवाजीनगर या तीन पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकांनी संशयीताचा शोध सुरु केला. यादरम्यान कर्नाटक राज्यात गेलेल्या एका पोलीस पथकाला शनिवारी दुपारी मृत शुभमच्या खूनातील तिघा संशयीताच्या मुसक्या आवळण्यास यश आले. या तिघांनी प्रेमप्रकरणातून खून केल्याची कबुली पोलिसांना दिल्याची माहिती सुत्रानी दिली.