प्रतिनिधी / इचलकरंजी
येथील एका बड्या राजकीय नेत्यांच्या मुलासह नातवाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या दोघांसह शहरातील एकूण बधितांची संख्या आता ५३ वर पोहचली आहे.
या राजकीय नेत्यांनी याबाबत सोशल मीडियावर कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढत असून आमच्या घरामध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याने आम्ही १४ क्वारंटाईन होत असल्याचा संदेश दिला आहे. तसेच नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे. बाधीत दोघे रुग्ण कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्याचे समजते.