इचलकरंजी / प्रतिनिधी
कर्ज वसुलीसाठीचा तगादा आणि व्यवसायातील नुकसानीमुळे यंत्रमाग कारखानदार अमर डोंगरे यांनी 22 डिसेंबर 2020 रोजी पंचगंगा नदीत आत्महत्या केली होती. याप्रकरणी आज 6 जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
येथील यंत्रमाग कारखानदार अमर डोंगरे 22 डिसेंबर 2020 रोजी उद्योगातील नुकसानीमुळे पंचगंगा नदीत आत्महत्या केली होती. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली होती. त्यामध्ये व्यवसायातील भागीदार, खाजगी सावकार मृत्यूस जबाबदार असल्याचे नमुद केले होते. त्यानुसार तपास केला असता अमर डोंगरे आणि अशोक व्यास (रा. यशोलक्ष्मीनगर), लक्ष्मीकांत तिवारी (रा. तिवारी अपार्टमेंट) हे पद्मावती एक्सपोर्ट या कापड व सुत दलालीच्या फर्ममध्ये भागीदार होते. तसेच व्यास, तिवारी आणि संगिता नरेंद्रकुमार पुरोहित (रा. कापड मार्केट हौसिंग सोसायटी), प्रविण कबाडे, अमोल कबाडे ( दोघे रा. तारा हॉटेल) यांच्या स्वस्तिक क्रीएशन नावाच्या कापड, सुत दलालीच्या फर्ममध्येही डोंगरे हे भागीदार होते.
व्यावसायातील भागिदारांनी डोंगरे यांना सुरूवातीला नफा असल्याचे भासवले मात्र नंतर तोटा असल्याचे वार्षिक ताळेबंद तयार केले. कंपनीतील माल परस्पर विकला पण त्याची नोंद ताळेबंदात केली नाही. यातून डोंगरे यांची फसवणुक झाल्याने दोन्ही व्यसायात नुकसान झाले. त्यामुळे व्यवसायासाठी डोंगरे यांनी बँक, पतसंस्था, खाजगी सावकार बाबुराव शिंत्रे (रा. इचलकरंजी) याच्याकडून कर्ज घेतले होते. कर्जाच्या वसुलीसाठी शिंत्रे तगादा लावल्याने पंचगंगा नदीत आत्महत्या केली होती. याप्रकरणी सौरभ डोंगरे यांनी फिर्याद दिली होती. डोंगरे यांनी मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीची शहानिशा करून आज सहाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









