गुंतवणुकीसह रक्कम काढण्यावर राहिला भर – एएमएफआय याची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाच्या कारणास्तव प्रभावीत झलेले म्युच्युअल फंडामध्ये आता गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा परतला असल्याचे दिसून येत आहे. याच कारणामुळे मार्चमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये 9,115 कोटी रुपयाचा निव्वळ गुंतवणूक झाली आहे. मागील 9 महिन्यात ही पहिलीच संधी आहे. जुलै ते आतापर्यंत इक्विटी म्युच्युअल फंडातून पैसे काढण्याचीच प्रक्रिया झालेली आहे.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया(एएमएफआय) यांच्या उपलब्ध माहितीनुसार मागील महिन्यात गुंतवणूकदारांनी डाटा म्युच्युअल फंडातून 52,528 कोटी रुपये काढले होते, जे फेब्रुवारी 2021 मध्ये 1,735 कोटीची गुंतवणूक केल्याची माहिती आहे. रक्कम काढण्याच्या तुलनेत मार्चमध्ये इक्विटी आणि इक्विटी लिंक्ड ओपन एडेड स्कीमची गुंतवणूक ही 9,115 कोटीवर राहिली आहे. मागील महिन्यात मल्टी कॅप आणि व्हॅल्यू फंड सोडून सर्व वर्गात गुंतवणूक प्राप्त झाल्याचे दिसून आले आहे.
मागील जुलैमध्ये 2480 कोटी रुपयाची निव्वळ रक्कम काढली होती. मागील चार वर्षात ही स्थिती प्रथमच झाल्याची माहिती आहे. इक्विटी योजनांमध्ये निव्वळ रक्कम काढण्यामध्ये ऑगस्टमध्ये 4,000 कोटी रुपये, सप्टेंबरमध्ये 734 कोटी रुपये, ऑक्टोबरमध्ये 2,725 कोटी रुपये इतकी रक्कम काढली आहे. तर 2020 मधील नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक 12,917 कोटी रुपये काढले आहेत. या पाठोपाठ डिसेंबरमध्ये 10,147 कोटी रुपय, जानेवारी 2021 मध्ये 9,253 कोटी रक्कम काढल्याची नोंद आहे.
इक्विटीज-गोल्ड इटीएफमधील गुंतवणुकीत वाढ
इक्विटी म्युच्युअल फंडच्या व्यतिरिक्त आणि गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स म्हणजे इटीएफमध्ये मागील महिन्यात गुंतवणूक वाढली आहे. यामध्ये मार्चमध्ये विविध योजनांच्या अंतर्गत 662 कोटी रुपयाची निव्वळ गुंतवणूक झाली. फेब्रुवारीत 491 कोटी रुपयाची गुंतवणूक झाली होती.









