प्रतिनिधी/ गगनबावडा
जैवविविधता व्यवस्थापन करताना केंद्रिय वन आणि पर्यावरण विभागाने राधानगरी वन्यजीव अभयारण्य संवेदनशील झोन मध्ये गगनबावडा तालुक्यातील चार गावांचा समावेश केला आहे. यापूर्वी २२ गांवे समाविष्ट केली होती.तब्बल १८ गांवे वगळल्याने तालुक्यास दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २६ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५ गांवे समाविष्ट केली आहेत.
राधानगरी वन्यजीव अभयरण्यातील जेवविविधता आणि वन्य जिवांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी या अभयारण्याचा विस्तार करण्यात आला आहे. अभयारण्याच्या सिमेच्या चारीही बाजूने २०० मीटर ते ६.०१ किमी पर्यंत विस्तार क्षेत्र करून या परिघातील गावे सवेदनशील झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यात कोल्हापूर जिल्हातील २६ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५ महसूल गावांचा समावेश होतो. केंद्रिय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने याबाबतची अधिसुचना जारी केली असून ती भारतीय राजपत्रात प्रसिदध करण्यात आली आहे. या विस्तारित क्षेत्राच्या देखरेखीसाठी गठीत करण्यात आली आहे.
राधानगरी वन्यजीवअभयारण्यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतीसह सस्तन प्राण्यांच्या ४७ प्रजाती , सर्फांच्या ५९ प्रजाती , उभयचर प्राण्यांच्या २० प्रजाती , फुलपाखरांच्या ६० प्रजातीसह विवीध प्रकारचे पक्षीही आढळतात. या अभयारण्यातील प्रतिनिधित्व हे पश्चिम तट अर्ध सदाबहार वन , दक्षिणी उष्णकटिबंधीत आद्र मिश्रीत कर्णपाती वन, तसेच पश्चिमी तट उष्ण कटिबंधीय सदाबदार वनात होते. या अभयारण्यातील बिबट्या , रानमांजरे, जंगली कुत्र, शेखरू, रानटी हत्ती, गवा रेडे, पटटेरी वाघ, लांडगे आदि प्रजाती आहेत. या जैवविविधतेच्या संवर्धनासाठी केंद्रिय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने अभया�








