मे महिन्याच्या पंधरवडय़ात गॅसची मागणी 24 टक्क्मयांनी तेजीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात मागील साठ दिवसांपासून लॉकडाऊन असल्यामुळे इंधनाची मागणी घटली होती. परंतु तिच मागणी आता काहीशा प्रमाणात वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने पेट्रोल आणि डिझेल यांचा समावेश आहे. लॉकडाऊन कायम असले तरी काही बाबतीत संचारासाठी मुभा दिली गेल्याने वाहनांचे प्रमाण रस्त्यांवर वाढताना दिसते आहे. याचाच परिणाम इंधन मागणी वाढण्यात झाला आहे. एप्रिलमध्ये तर सर्वाधिक प्रमाणात इंधनाची घट झाल्याची नोंद करण्यात आली होती.
मे महिन्यात मात्र तिसऱया टप्प्यातील लॉकडाऊन संपत चौथ्या सत्रातील लॉकडाऊनचा कालावधी सुरु झाला आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालय व गृह मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या नियमावलीचा आधार घेत देशात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन यामध्ये जिल्हय़ांची विभागणी करण्यात आली आहे. तसेच 18 मेपासून चौथ्या सत्रातील लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे संबंधीत राज्यांना परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची परवानगी दिली असल्यामुळे इंधनाच्या मागणीला वेग धरण्यास मोठय़ा प्रमाणात सुरुवात झाली आहे.
सरकारी क्षेत्रातील कार्यरत असणाऱया कंपन्यांकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मे महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात डिझेलची विक्री एप्रिल 2020च्या तुलनेत जवळपास 75 टक्क्मयांनी वधारुन 19.30 लाख टनाच्या घरात पोहोचली आहे. या प्रकारे पेट्रोलची विक्री मात्र 72 टक्क्मयांनी वाढून 5.75 लाख टनावर पोहोचली आहे. दुसऱया बाजूला विमान इंधनाची मागणी दुप्पट होत 39 हजार टनावर गेली आहे. मे 2019 च्या कालावधीचा तपशील पाहिल्यास हा आकडा कमी असल्याची नोंद केली आहे. अन्य इंधनाचा विचार केल्यास घरगुती गॅस सिलेंडरची मागणी मात्र मे महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात 24 टक्क्मयांनी वाढून 12 लाख टनावर पोहोचली आहे. जी मागणी वर्षातील समान कालावधीत 9.65 लाख राहिली होती.









