ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पेट्रोलियम कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. त्यानुसार, आज पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर 22 ते 25 पैशांनी वाढ झाली. डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 24 ते 27 पैशांनी वाढ झाली आहे.
बुधवारी मुंबईत पेट्रोलचा दर 97.61 रुपये तर डिझेल 88.82 रुपये प्रति लिटर इतके होते. तर आज मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 98.36 रुपये तर डिझेल 89.75 रुपये इतके झाले आहे.

दिल्लीत पेट्रोल 92.05 रुपये तर पेट्रोल 82.61 रुपये इतके झाले आहे. चेन्नई पेट्रोल 93.84 रुपये तर डिझेल 87.49 इतके आहे. आणि कोलकातामध्ये पेट्रोल 92.16 रुपये तर डिझेल 85.45 रुपये इतके वाढले आहे.
- भोपाळमध्ये पेट्रोल 100.8 रुपये
भोपाळमध्ये एक लिटर पेट्रोल 100.08 रुपये मिळत आहे. तर डिझेल 90.95 रुपये प्रति लिटर इतके आहे.
- दररोज 6 वाजता किंमती बदलतात
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात









