ऑनलाईन टीम
देशात कोरोना महामारी, अतिवृष्टीने जनता मेटाकुटीस आली असतानाच आता महागाईने जनता त्रस्त झाली आहे. दिवसागणित वाढत चालेले इंधनाचे दर यामुळे जनता हैराण झाली आहे. त्यातच घरगुती गॅस दरातही वाढ झाल्याने नागरिकांचे आर्थिक गणित पुर्णता कोलमटले आहे. गेल्या काही दिवसात पेट्रोलच्या दरात १५ वेळा तर डिझेलच्या दरात १८ वेळा वाढ झाली आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दराने उच्चांक गाठला आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलच्या दरात लिटरमागे ३० ते ३५ पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेलमध्ये ३३ ते ३७ पैसे दरवाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर १०५.४९ रुपये तर, डिझेल ९४.२२ रुपयेवर जावून पोहचले आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल १११.४३ रुपये तर डिझेलसाठी १०२.१५ रुपये मोजावे लागत आहेत. कोलकतामध्ये पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे १०६.१० आणि ९७.३३ रुपये हे प्रति लिटरमागे मोजावे लागत आहेत. तर चैन्नईत पेट्रोलचे १०२.७० तर डिझेलचे ९८.५९ रुपये प्रति लिटर हे दर आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









