मंगळवारी पेट्रोलचा दर १२१ रूपयांवर
सावंतवाडी/प्रतिनिधी-
पेट्रोल डिझेलचा भडका सुरूच असून सावंतवाडीत पेट्रोल 121 रूपयांवर पोहोचले आहे तर डिझेल 104 रूपयांवर गेले आहे. 21 मार्च पासून स्थिर असलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. 80 पैशाच्या चढत्या क्रमाने प्रतिलिटर पेट्रोल, डिझेल वाढत आहे. 21 मार्चला पेट्रोल 111 रूपये 43 पैसे तर डिझेल 94 रुपये 61 पैसे होते. दोन्ही दरात प्रत्येक 10 रुपयांची वाढ झाली आहे.
महागाईच्या भडक्याचा सर्वांनाच चटका बसत असून अजूनही पेट्रोल बहुसंख्य ग्राहकांचा कल सरासरी 100 रुपयांपर्यंत पेट्रोल भरण्यावरच आहे.









