स्वतःहून चार्ज होणारी अनोखी रेल्वे
मागील दशकांमध्ये विज्ञानाने अभूतपूर्व यश मिळविले आहे. एकेकाळी अशक्य वाटणाऱया गोष्टी आता सोप्या वाटत आहेत. पूर्वी वाफेच्या इंजिनाद्वारे रेल्वे धावायची, आता डिझेलने आणि वीज तसेच सौरऊर्जेने रेल्वे धावत आहे. परंतु आता काही वर्षांमध्ये रेल्वे कुठल्याही इंधनाशिवाय धावणार आहे. कुठल्याही इंधनाशिवाय वेग पकडणारी रेल्वे विकसित झाली आहे. या रेल्वेला अंतर कापण्यासाठी इंधनाची गरज भासणार नाही.

ही विशेष रेल्वे गुरुत्वाकर्षणाच्या बळावर धावणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या एका कंपनीने गुरुत्वाकर्षणाद्वारे धावणाऱया या रेल्वेची निर्मिती सुरू केली आहे. या रेल्वेला इनफिनिटी ट्रेन म्हटले जात आहे. या रेल्वेमुळे प्रदूषण मोठय़ा प्रमाणात कमी होणार ओह. याचबरोबर रेल्वेच्या रीफ्यूलिंगची कुठलीच गरज भासणार नाही.
या रेल्वेद्वारे उत्सर्जन शून्य असणार आहे. तसेच कमी वेळेत आणि कमी खर्चात वाहतूक करता येणार आहे. ट्रेनची निर्मिती करणारी कंपनी फोर्टेस्क्यूने विलियम्स ऍडव्हान्स्ड इंजिनियरिंगची खरेदी करत काम सुरू केले आहे. ही रेल्वे एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी जाताना आपोआप चार्ज होणार आहे.
या मालवाहतुकीच्या रेल्वेत 244 बोगी असतील, ज्यातून 34,404 टन लोहखनिज ठेवले जाणार आहे. फोर्टेस्क्यूच्या सीईओ एलिझाबेथ गेन्स यांनी या रेल्वेला जगातील सर्वोत्तम रेल्वे ठरविले आहे.









