भगवान श्रीकृष्णाला पांडवांविषयी विशेष प्रेम होते. ज्ञानेश्वर माउली हरिपाठात म्हणतात-
द्वारकेचा राणा पांडवांघरी।महामुनी शुकदेव राजा परिक्षितीला पुढील कथा वर्णन करून सांगतात-
मग कोण्हे एके सुदैव दिवसीं ।पाण्डवप्रेमें हृषीकेशी।
जाकळूनि त्यां देखावयासी । इंद्रप्रस्थासी चालिला r।
प्रेमें जाकळावया कारण । जे लाक्षागारिं पाण्डवां मरण । तेचि प्रकटले पुन्हा वांचोन । पाञ्चाळभुवनीं अकस्मात r। द्रौपदीचिये स्वयंवरिं । प्रकट जाले पाञ्चाळपुरिं । यंत्र भेदूनि राजे समरिं । जिणोनि नोवरी परणिले r।कौरवांचा भंगिला दर्प । दाविला भूचक्री प्रताप । इंद्रप्रस्थी युधिष्ठर नृप । गृहस्थ होऊनि नांदतसे r।ऐसिया पाण्डवांतें श्रीपति । पहावयाकारणें सप्रेमप्रीति । सात्यकिप्रमुख वाहिनेपति । दारुक सारथि रथ सज्जी r।शुभमुहूर्तीं द्वारकापुर । सोडूनि निघाला जगदीश्वर । वामभागीं चास मयूर । जातां सूचिती शुभ शकुन r।दक्षिणभागीं सवत्स धेनु । स्वर्चित ब्राह्मण प्रसन्नवदन । भेटले तिहीं आशीर्वचन । देऊनि कल्याण इच्छिलें r।
कृष्णाचा प्रपंच द्वारकेत आनंदात चालला होता. एके दिवशी कृष्णाला पांडवांची उत्कटतेने आठवण आली. प्रेमाने उचंबळून तो त्यांना भेटण्यासाठी इंद्रप्रस्थ नगरीला जायला निघाला. पांडवांचे प्रेम उफाळून यायला कारणही तसेच होते. जे पांडव लाक्षागृहात जळून मेले अशी बातमी सर्वत्र पसरली होती, ते जिवंतपणी पांचाळांच्या राज दरबारी अचानक हजर झाले होते. द्रौपदीच्या स्वयंवरात ते प्रकट झाले. अर्जुनाने मत्स्ययंत्राचा आपल्या बाणाने भेद केला आणि विवाहाचा पण जिंकला. द्रौपदीचा पांडवांबरोबर विवाह झाला. कौरवांचे गर्वहरण झाले. आता पांडव जिवंत परत आल्यावर त्यांना राज्यात हिस्सा देणे भागच पडले. त्यांना इंद्रप्रस्थाचे राज्य देण्यात आले. युधि ष्ठर इंद्रप्रस्थाचा राजा झाला. पांडव इंद्रप्रस्थावर आनंदाने राज्य करू लागले. अशा पांडवांना भेटायला कृष्ण आतुरतेने द्वारकेहून निघाला. सोबत सेनापती सात्यकी होता. दारुक रथाचा सारथी होता. शुभमुहूर्तावर कृष्णाचा रथ निघाला. वाटेत रस्त्याच्या डाव्या बाजूला मोर दिसले. उजव्या बाजूला सवत्स धेनु दिसली. हे शुभ शकुन होते. ब्राह्मण कृष्णाला पाहून मंगलमय आशीर्वाद देत होते.
एकेचि समयीं पांचही वीर । वळघोनि उत्तुंग गोपुर ।
समीप देखोनियां श्रीधर । धांविले सत्वर सामोरे । अवयव इंद्रियें पंचप्राण । उपरम पावतां विश्वाभिमान । असतांही सचेतन । वृत्तिशून्य तीं आघवीं r।कीं मुख्यविश्वाभिमानागमनें । होतीं सर्वही सचेतनें । स्वव्यापारिं प्राणकरणें । तच्चैतन्ये प्रवर्तती। तेंवि अखिलात्मा अखिलेश्वर । मुकुंद सुखकंद श्रीधर । तदागमनें अतिसत्वर । उठिले कुमर पाण्डूचे r।चंद्रें अधि÷ितां उदयाद्रि । सिंधुजळ धांवे सामोरी । तेंवि पाण्डव पादचारी । सेविती हरि अभिगमनें r।पांचही बंधु एकेचि समयीं । देखोनियां शेषशायी । कैसे भेटते जाले तेंही । श्रवणालयीं निवेदितों। द्वारकेपासून इंद्रप्रस्थ बरेच दूर होते. अनेक नगरे व राज्ये ओलांडत कृष्णाचा रथ धावत होता. वाटेत अनेक भक्त त्याचे स्वागत करत होते. बऱयाच प्रवासानंतर कृष्णाचा रथ इंद्रप्रस्थ नगरीजवळ पोहोचला.
देवदत्त परुळेकर








