युधिrर श्रीकृष्णाला पुढे म्हणाला-भगवंता! आम्ही भाग्यवान आहोत. योगेश्वरसुद्धा अत्यंत प्रयासाने ज्यांचे दर्शन घेतात, त्या आपण आम्हा सामान्यांना अनायासे दर्शन दिलेत. आज आमचे भाग्य उदयाला आले. पूर्वजांचा उद्धार झाला. आमच्या जीवनाचे सार्थक झाले. कारण आज आपले दर्शन झाले.
एवं अनेक जन्मपाठीं । फळल्या अनेकसुकृतकोटी ।
तेणें तव पद पडिलें दृष्टी । परी वासना पोटीं उरलीसे ।
ते तूं वासना म्हणसी काय । जे वार्षिक मासचतुष्टय ।
स्थिर होऊनि आमुचें हृदय । निववीं सदयशिरोमणि।
स्वभक्तांचे प्रार्थनोत्तरिं । कृपे कळवळूनियां श्रीहरि ।
इंद्रप्रस्थी। मास चारी । धर्ममंदिरिं स्थिरावला ।
युधि÷ाrराने भगवंताचे पाय धरले व म्हणाला – भगवन्! आज आपले चरण आम्हाला मोठय़ा पुण्याईने लाभले. पण आमची एक इच्छा आपण पूर्ण करावी. आपण आमच्या घरी चार महिने वास करावा. आमच्या हृदयात स्थिर व्हावेस. आपल्या भक्ताची प्रार्थना ऐकून कृष्णाच्या मनात करुणा उत्पन्न झाली व तो चार महिने इंद्रप्रस्थ नगरीत लोकांच्या डोळय़ांना आनंद देत राहिला.
कोण्हे एके अपूर्व समयीं । विजयनामा अर्जुन पाहीं ।
वानरध्वज रथाच्या ठायीं । आरूढोनियां निघाला ।
अग्निदत्त अमोघ बाण । तिहीं भरिले अक्षय तूण ।
गांडीव चापातें घेऊन । रथारोहण करूनियां ।
कृष्णेंसहित सन्नद्धबद्ध । मृगयेकारणें साटोप सिद्ध ।
विपिनीं विहरावया प्रसिद्ध । गहन अगाध प्रवेशले ।
कैसें म्हणाल अगाध गहन । व्याघ्रप्रमुखमृगाकीर्ण ।
सर्प वृश्चिक शकुंट श्येन । ऋक्षराक्षसकपिव्याप्त ।
एकदा वीर अर्जुन कवच अंगावर चढवून गांडीव धनुष्य आणि अक्षय बाणांचे दोन भाते घेऊन वानरध्वज असलेल्या रथात बसून पुष्कळ हिंस्त्र प्राणी असलेल्या निबिड अरण्यात शिकारीसाठी गेला. त्याच्या सोबत श्रीकृष्ण देखिल होते. तेथे त्याने बाणांनी वाघ, डुकरे, रेडे, काळवीट, चित्ते, गौरेडे, गेंडे, हरिण, ससे, साळी इत्यादी प्राणी मारले. त्यांपैकी पवित्र पशू पर्वकाळ आलेला पाहून सेवकांनी राजा युधि÷ाrराकडे नेले.
मारितां श्वापदांचिया श्रेणी।
भास्करतापें परिश्रांत वनीं।
तृषार्त यमुनेतें टाकुनी ।
गांडीवपाणि पातला ।
भास्करें लंघूनियां मध्याह्ना।
प्रतीची उजू करितां गमना।
कृष्णार्जुन यमुनापुलिना । जवें स्यंदनासह आले । प्राशूनि यमुनाजळ निर्मळ । तुरंग जाले सुशीतळ। त्यानंतरें पार्थ गोपाळ । सेविती सलिल तें ऐका।महारथी कृष्णार्जुन । करूनि करचरणक्षाळण। करिती निर्मळ जळप्राशन । छाया सेवून स्थिरावले ।
इकडे अर्जुन शिकार करून दमला होता. माध्यान्हीचा सूर्य डोक्मयावर आग ओकत होता. तहान लागल्यामुळे अर्जुन व कृष्ण दोन्ही महारथी यमुनेवर गेले. यमुनेच्या पाण्यात त्यांनी हातपाय धुतले. नदीचे निर्मळ पाणी प्याले. नंतर सावली पाहून ते बसले.
कृष्णा आणि धनुर्धरा । कृष्णनामचि दोघां वीरां ।
देखते जाले ते सुंदरा । कन्या नीरामाजिवडी ।
दर्शनमात्रे। समाधाना । पाववी यास्तव चारुदर्शना । यमुनाजीवनीं क्रीडतां नयनां ।








