ऑनलाईन टीम / इंदौर :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दरम्यान, इंदौर मध्ये या महामारी ची सुरुवात दोन महिन्यांपूर्वी झाली होती. या दोन महिन्यात ही संख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्य चिकित्सा आणि स्वास्थ्य अधिकारी प्रवीण जडिया यांनी सांगितले की, रविवारी म्हणजेच मागील चोवीस तासात जिल्ह्यात 75 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे इंदौर मधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3008 वर पोहचली आहे.
एक महिला आणि दोन पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुढे ते म्हणाले, मागील दोन – तीन दिवसात या तीन मृत्यू व्यतिरिक्त जिल्ह्यातील 1,412 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, इंदौर जिल्हा सध्या रेड झोन मध्ये असून प्रशासनाकडून शहरात 25 मार्च पासून कर्फ्यू लावण्यात आला असून सर्वत्र कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.









