ऑनलाईन टीम / नगर :
पुत्रप्राप्तीच्या फॉर्म्युल्यावरुन वादाच्या भोवऱयात अडकलेल्या हभप. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या समर्थनार्थ आज अकोले तालुक्यात बंद पाळण्यात आला आहे.
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी इंदोरीकरांच्या वक्तव्याप्रकरणी त्यांना काळे फासण्याची भाषा केली केली होती. त्याचा निषेध म्हणून हा बंद पाळण्यात आला आहे.
सकाळी आठ वाजता शहरातील साई लॉन्स इंदोरी फाटा ते महात्मा फुले चौक येथे भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर 9.30 वाजता महात्मा फुले चौक ते बाजार तळ येथे भव्य भजन दिंडी मोर्चा काढण्यात आला. आता बाजारतळ येथे निषेध सभेला सुरूवात झाली आहे.
इंदोरीकरांच्या समर्थनार्थ निषेध सभेला हजारो इंदोरीकर समर्थकांबरोबरच विविध वारकरी संघटना, ग्रामस्थ आणि माजी आमदार वैभव पिचड यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित आहेत.








