प्रा. डॉ. मनीषा नेसरकर यांचे प्रतिपादन, लोकमान्य ग्रंथालयातर्फे स्मृतिदिन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावच्या अक्कांची – इंदिरा संतांची कविता ओवी वृत्तात, बहिणाबाईंची आठवण करुन देणारी,निसर्गाशी संबंधित, गेय पध्दतीची व कालातीत अशी होय अशा शब्दांत प्रा.डॉ. मनीषा नेसरकर यांनी कवयित्री इंदिरा संतांच्या साहित्याची ओळख करुन दिली. मंगळवार दि.04.01.2022 रोजी संध्याकाळी लोकमान्य ग्रंथालयात इंदिरा संतांच्या स्मृतीदिनी हा कार्यक्रम झाला.प्रारंभी कार्याध्यक्ष श्री. जगदीश कुंटे व प्रमुख व्याख्यात्या मनीषा यांनी इंदिरा संतांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत आदरांजली वाहिली.सौ.हिमांगी प्रभूनी ओळख करुन दिली. किशोर काकडेनी स्वागत-प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
डॉ मनीषा नेसरकर पुढे म्हणाल्या की कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील गावात जन्मलेल्या अक्कांच्यावर दोन्ही कडचे संस्कार घडले.त्या अत्यंत संवेदनशील होत्या .निसर्ग, निरीक्षण,संसार याचा प्रत्यय कवितांतून उमटतो.आपल्या पतीसह त्यांचा सहवास हा काव्यसंग्रह महत्त्वाचा. “तुझा सहवास जसा पहाटेचा वारा”” “”, नको पाठवू अक्षरामधूनी शब्दांमधले अधूरे स्पंदन”,”अजूनही जागा आहे स्पर्श तुझा कायेवरती” या काव्यओळीतून त्यांची झलक दिसते.,”अक्कू बक्कूची दिवाळी”या सुप्रसिद्ध कवितेतून स्त्री मध्ये असलेला उपजत समजूतदारपणा उमगतो.त्या स्त्री गीते जमवित व भारतीय स्त्री त्यांचा जीव्हाळय़ाचा विषय होता.अशारीतीने इंदिरा संतांचे जीवन,काव्यप्रवास,काव्यकळा आदिची मनीषाजीनी सुंदर मांडणी केली.ग्रंथपाल सौ.रंजना कारेकरनी आभार मानले.कार्यक्रमाला संत परीवारही उपस्थित होता.









