ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताप्रमाणेच इंडोनेशियानेही फ्रान्ससोबत राफेल विमाने खरेदीचा करार केला आहे. हा करार 8.1 अब्ज डॉलरचा असून, यात इंडोनेशियाला 42 राफेल विमाने मिळणार आहेत. या करारानुसार इंडोनेशियाला भारतापेक्षा कमी दराने अधिक राफेल विमाने मिळणार आहेत.
भारताने 2016 मध्ये फ्रान्ससोबत 8.7 अब्ज डॉलरचा 36 राफेल विमानांचा करार केला होता. आता इंडोनेशियाने 8.1 अब्ज डॉलरचा राफेल करार केला आहे. ज्यामध्ये इंडोनेशियाला 42 राफेल विमाने मिळणार आहेत. म्हणजेच भारताने मोजलेल्या किंमतीपेक्षा कमी पैशात इंडोनेशियाला भारतापेक्षा 6 राफेल जास्त मिळणार आहेत.
फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, इंडोनेशिया आणि फ्रान्समध्ये राफेल करारावर स्वाक्षऱया झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात इंडोनेशियाला सहा राफेल विमाने सुपूर्द करण्यात येतील. पुढील 36 विमाने पुढील फेरीत हस्तांतरित करण्यात येणार आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला राफेलची संपूर्ण डिलिव्हरी इंडोनेशियाला केली जाईल.









