वानराच्या आवाजाने झाली मंचनची सुरुवात
इस्लामिक देश इंडोनेशियातील 85 टक्के हिंदू लोकसंख्या असलेल्या बालीमध्ये नववर्षापूर्वी केनकाना पार्कमध्ये गरुड विष्णू केनकाना केचक नृत्याचे आयोजन झाले. हे नृत्य रामायणावर आधारित आहे. मंचनची सुरुवान वानराच्या आवाजाने झाली, त्यानंतर सुमारे 100 पुरुष रंगमंचावर प्रकटले. ते बाली नृत्यशैलीत सीताहरणचे दृश्य साद करू लागले.

लवकरच हनुमानाच्या नेतृत्वाखाली वानर, रामासोबत रावणाला पराभूत करण्यास मदत करू लागत असल्याचे यात दाखविण्यात आले. हे नृत्य पाहण्यासाठी देशविदेशातून भाविक आणि पर्यटक मोठय़ा संख्येत उपस्थित होते. केनकाना पार्कमध्ये गरुड विष्णूची 393 फूट उंचीची मूर्ती स्थापन करण्यात आली असून याच्या निर्मितीकरता 25 वर्षे लागली आहेत. अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या तुलनेत ही मूर्ती अधिक रुंद आहे. गरुडाचे पंखच 60 मीटरच्या आकाराचे आहेत.
घरोघरी गणेश विराजमान
तेथील प्रत्येक घर आणि रेस्टॉरंटबाहेर केळीच्या पानांनी तयार केलेल्या प्लेटमध्ये देवतांसाठी फूल आणि तांदूळ ठेवण्यात येतात. भगवान गणेशाची मूर्ती घर तसेच महत्त्वपूर्ण इमारतींच्या द्वारावर दिसून येते. बालीतील प्रत्येक घर मंदिरासारखे असून तेथे नकारात्मकतेला स्थान नाही.









