ऑनलाईन टीम / जकार्ता :
इंडोनेशियातील मुस्लिम समुदाय स्वतःला प्रभू श्रीरामांचे वंशज मानतो. या देशात 98 टक्के मुस्लिम समुदाय असून, ‘रामलीला’ हे या देशाचे प्रमुख लोकनाट्य आहे.
इंडोनेशियातील बाली, जाकार्ता, जावा या शहरांमध्ये रामायण आणि रामलीला विशेष लोकप्रिय आहे. भारतातील आणि इंडोनेशियातील रामायण थोडे वेगळे आहे. भारतात वाल्मीकी रामायण सांगितले जाते. इंडोनेशियामध्ये ‘काकाविन’ नावाचे रामायण सांगितले जाते. नवव्या शतकात योगीश्वर यांनी ‘कावी’ भाषेत हे रामायण रचल्याचे सांगण्यात येते.
इंडोनेशियामध्ये 1961 पासून अखंड रामलीला चालू आहे. त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. रामाला मानणारा हा एकमेव मुस्लिम देश आहे. या देशातील विमानतळ, अनेक शहरातील चौकाचौकात राम, कृष्ण आणि अर्जुनाच्या मुर्त्या आहेत. पाचव्या शतकांमध्ये हिंदू धर्माचा तेथे प्रचार प्रसार झाल्याचे सांगण्यात येते.









