19.89 टक्क्मयांच्या घरात हिस्सेदारी : मार्च तिमाहीत 4.7 कोटींची समभाग खरेदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डिमार्टची प्रमोटर कंपनी एवेन्यू सुपर मार्केटचे संस्थापक राधाकृष्ण दमानी आणि त्यांचे भाऊ गोपीकृष्ण दमानी यांची मार्च तिमाहीमधील इंडिया सिमेंटस्मधील हिस्सेदारी आणखी वाढविली आहे. मार्च तिमाहीच्या शेवटी दमानी बंधूंची हिस्सेदारी वाढून 19.89 टक्क्मयांच्या घरात पोहोचली आहे.
गोपीकृष्ण दमानी आणि राधाकृष्ण दमानी यांनी जानेवारी ते मार्च 2020 या कालावधीत इंडिया सिमेंटस्चे 4.7 कोटींचे अतिरिक्त समभाग खरेदी केले आहेत. या कंपनीचे एकूण समभाग 15.16 टक्के हिस्सेदारीचे आहेत. या अगोदर डिसेंबर 2019 च्या तिमाहीपर्यत इंडिया सिमेंटस्मध्ये दमानी कुटुंबाची 4.73 टक्के हिस्सेदारी होती.
कंपनीकडून सादर करण्यात आलेल्या शेअरहोल्डींग पॅटर्ननुसार 31 मार्चला समाप्त झालेल्या तिमाहीच्या आधारावर इंडिया सिमेंटस्मध्ये राधाकृष्ण दमानीची हिस्सेदारी 1029 टक्के तर गोपीकृष्ण दमानीची हिस्सेदारी 8.26 टक्के राहिली आहे. दोन्ही भावांची मिळून एकत्रित 1.34 हिस्सेदारी वेगळी आहे. यामुळे दमानी कुटुंबाची हिस्सेदारी 19.89 टक्के झाली आहे.
दुसरा मोठा हिस्सेदार
नवीन शेअरहोल्डींग पॅटर्ननुसार दमानी परिवार आता इंडिया सिमेंटस्मध्ये 19.89 टक्केंच्या हिस्सेदारीसोबत दुसरा सर्वात मोठा हिस्सेदार बनला आहे. तसेच इंडिया सिमेंटस्च्या प्रमोटर्सची हिस्सेदारी आता 28.26 टक्क्मयांवर राहिली आहे.









