8 डिसेंबर रोजी आयोजन होण्याचे संकेत
नवी दिल्ली
इंडिया मोबाईल काँग्रेसचे(आयएमसी) व्हर्चुअल आयोजन येत्या 8 ते 10 डिसेंबर रोजी होणार आहे. हा कार्यक्रम दूरसंचार क्षेत्राच्या समर्थनार्थ होणार असल्याची माहिती आहे. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सीओएआय) च्या महासंचालक एस. पी. कोचर यांनी या आयोजनाची घोषणा केली असून यावेळी मोठी भागीदारी मिळण्याचे संकेतही व्यक्त केले आहेत.
दूरसंचार सचिव अंशु प्रकाश यांनी, हा कार्यक्रम 2020 मध्ये आयोजित करण्यात येणार होता. परंतु कोरोना संकटासह अन्य समस्यांमुळे या कार्यक्रमास विलंब लागल्याचे म्हटले आहे.
दक्षिण आशियातील सर्वात मोठय़ा तंत्रज्ञानावर आधारीत कार्यक्रम सादर होणार आहे. याकरीताचे आवश्यक ते कार्य सुरुच ठेवणार असल्याची माहिती आहे. दूरसंचार विभाग कमीत कमी 30 लघु आणि मध्यम उपक्रम (एसएमई) तसेच स्टार्टअप कंपन्यांनाही या आयोजनाचे भागीदार बनवून आर्थिक सहाय्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही स्पष्टीकरण दूरसंचार सचिवांनी दिले आहे.
जगातील दिग्गजांची उपस्थिती
सदरच्या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या कार्यक्रमात जगभरातील वरिष्ठ कार्यकारीही यामध्ये सहभागी होणार असून यासाठी जवळपास 15,000 पेक्षा अधिकजणांची भागीदारी घेण्याचे संकेतही सीओएआय अध्यक्ष अजय पुरी यांनी सांगितले आहे.









