मुंबई
इंडियन हॉटेलचे समभाग सध्याला तेजीच्या मूडमध्ये आहेत. सलग सहाव्या सत्रामध्ये हा समभाग तेजीमध्ये असून विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. कंपनीचे समभाग मंगळवारी बीएसईवर 2 टक्के वाढत 377 रुपयांवर पोहोचला होता. सोमवारच्या सत्रामध्ये कंपनीचा समभाग सरतेशेवटी 370 रुपयांवर बंद झाला होता. गेल्या सहा सत्रांमध्ये एकंदर हा समभाग 11 टक्के इतका वाढला आहे. बाजार भांडवल मूल्य 53,250 कोटी रुपये पेक्षा जास्त झाले आहे.









