श्री चषक ऑल इंडिया टेनिसबॉल स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
श्री स्पोर्ट्स खडक गल्ली आयोजित श्री चषक निमंत्रितांच्या ऑल इंडिया टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून फँको क्रिकेट क्लब, इंडियन बॉईज हिंडलगा, मराठा स्पोर्ट्स ग्रामीण, एस. आर. वॉरियर्स संघानी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून पुढील फेरीत प्रवेश केला. सोनू कुमद, शिवाजी पडकर, संतोष सुळगे पाटील, किरण बराडे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात फॅन्को क्रिकेट क्लबने 8 षटकात 8 बाद 87 धावा केल्या. यासिनने 29, सोनुने 16 धावा केल्या. सिद्धार्थ वॉरियर्सतर्फे रोहित पाटील व सतिश यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. याला उत्तर देताना सिद्धार्थ वॉरियर्सने 8 षटकात 5 बाद 73 धावाच केल्या. गोपी व रोहित यांनी प्रत्येकी 20 धावा केल्या. फॅन्कोतर्फे अरबाजने 2 गडी बाद केले. दुसऱया सामन्यात अनगोळ स्ट्रायकर्सने 8 षटकात 5 बाद 52 धावा केल्या. त्याला उत्तर देताना इंडियन बॉईज हिंडलगाने 2.4 षटकात बिनबाद 53 धावा करून सामना 10 गडय़ांनी जिंकला. त्यात शिवाजी पडकरने 45 धावा केल्या. तिसऱया सामन्यात डेपो मास्टरने 8 षटकात 5 बाद 52 धावा केल्या. त्याला उत्तर देताना मराठा स्पोर्ट्स ग्रामीणने 5.2 षटकात 3 बाद 53 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. अभिजित व सागर यांनी प्रत्येकी 20 धावा केल्या. चौथ्या सामन्यात अतिक स्पोर्ट्स संघाने 8 षटकात 9 बाद 64 धावा केल्या. त्याला उत्तर देताना एस. आर. वॉरियर्सने 5.5 षटकात 5 बाद 66 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. विशालने 23 धावा केल्या. पाचव्या सामन्यात फँको क्लबने 7.5 षटकात सर्व बाद 36 धावा केल्या. त्याला उत्तर देताना इंडियन बॉईज हिंडलगा संघाने 3.1 षटकात बिनबाद 40 धावा करून सामना 10 गडय़ांनी जिंकला. अवधूतने 22 तर शिवाजीने 17 धावा केल्या.
बुधवारचे सामने : यूपी इलेव्हन स्टार वि. मराठा स्पोर्ट्स बेळगाव सकाळी 8.30 वा., इंदिरा पॉईंट वि. एस. आर. एस. हिंदुस्थान सकाळी 10.30 वा., विघ्नहर्ता अनगोळ वि. कलमेश्वर स्पोर्ट्स दी. 12 वा., दुसऱया सामन्यातील विजेते वि. एस. आर. स्पोर्ट्स दु. 1.30 वा., पहिल्या सामन्यातील विजेता वि. तिसऱया सामन्यातील विजेता दु. 3.30 वाजता.