नवी दिल्ली
व्याज नफ्यात सुधारणा दिसल्याने डिसेंबरचा तिमाही इंडियन बँकेकरीता चांगला गेला आहे. इंडियन बँकेला डिसेंबर तिमाहीअखेर 514 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. मागच्या वर्षी समान कालावधीत बँकेला 1 हजार 739 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले होते. 1 एप्रिल 2020 रोजी अलाहाबाद बँकेचे विलीनीकरण इंडियन बँकेत झाले आहे. बँकेचा निव्वळ व्याज नफा तिसऱया तिमाहीत 31 टक्के वाढीव दिसून आला आहे. हा नफा 4 हजार 313 कोटी रुपयांवर पोहचला असून मागच्या वर्षी समान कालावधीत 3 हजार 293 कोटी रुपये होता.









