नवी दिल्ली
हवाई उद्योग क्षेत्रातील कंपनी इंडिगोने वर्षअखेरर्यंत 70 टक्के विमानसेवा देण्यासाठी तत्पर असणार असल्याचे सीईओ रोनोजॉय दत्ता यांनी सांगितले. सध्याला कोरोनामुळे निर्बंध असल्याने विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. बहुतेक येत्या जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करणे शक्य होईल. केंद्राने 50 टक्के विमानसेवा देण्यासाठी कंपन्यांना परवानगी देण्याची गरज असल्याचे इंडिगोने म्हटले आहे. कंपनीने कोवीडपूर्वी दिवसा 1500 पर्यंत विमाने सुरू ठेवली होती. यातील 20 ते 25 टक्के आंतरराष्ट्रीय मार्गावर सुरू होती. 25 मेनंतर स्थानिक स्तरावर विमान सेवा सुरू झाली असून केंद्राने 33 टक्केच विमान प्रवासासाठी परवानगी दिलीय. वर्षाअखेरपर्यंत 70 टक्के वाहतूक सुरू करण्यासाठी इंडिगोचे प्रयत्न राहतील.









