नवी दिल्ली
इंडिगो नावाने विमानसेवा बहाल करणाऱया इंटरग्लोब एव्हिएशनला 31 मार्च 2021 ला संपलेल्या तिमाहीत 1 हजार 147 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. यापूर्वी मागच्या वषी समान कालावधीत कंपनीला 870 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. इंडिगो ही देशातील सर्वात मोठी विमानसेवा बहाल करणारी कंपनी आहे. यांच्या ताफ्यात 285 विमाने आहेत. सध्या कोरोना महामारीमुळे विमानसेवेवर मोठा परिणाम जाणवत असून कंपनीच्या उत्पन्नावर मोठा प्रभाव दिसतो आहे. मार्च 2021 ला संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने 5 हजार 806 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा सहन केला होता.