वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडसइंड बँकेने मास्टरकार्डसोबत भागीदारी करुन आपले पहिले मेटल क्रेडिट कार्ड पायोनियर हेरिटेजकोचे सादरीकरण करणार असल्याची घोषणा केली आहे.
बँकेच्या माहितीनुसार सदर कार्डच्या आधारे विविध सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये प्रवास, वेलनेस आणि जीवन पद्धतीसह अन्य सुविधांवर बँकेने लक्ष केंद्रीत केले आहे.
कार्डवरील विशेष सुविधा
प्रवास : आंतरराष्ट्रीय व देशातील विमानतळावर लाउंजमध्ये अमर्यादीत मोफत प्रवेश
आर्थिक – 10 लाख किंवा त्यापेक्षा अधिकचा खर्च कार्डच्या आधारे करता येणार आहे. यासाठी वर्षाची शुल्क आकारणी नाही
? उशिरा पेमेंट शुल्क, रोख ऍडव्हान्ससह ओव्हर लिमिट लाईफटाईमसाठी मोफत
? प्रति 3 महिन्याला 4 मोफत चित्रपट तिकिटासोबत ंददक्स्ब्sप्दै.म्दस् किंवा बुकिंगवर 20 टक्के सवलत
विमा :
? 2.5 कोटी रुपयांचा वैयक्तिक हवाई दुर्घटना विमा
? कार्डवर क्रेडिट मर्यादेवर एक विमा कव्हरेज
? साहित्यावर 1 लाखाचा विमा
? प्रवासादरम्यान दस्ताऐवज हरवल्यास 75,000चा विमा संरक्षण









