कॅलिफोर्निया
चिपनिर्मिती करणारी सर्वात मोठी कंपनी इंटेल येणाऱया काळात चिप निर्मितीवर अधिक लक्ष केंद्रीत करणार आहे. याकरीता मोठी गुंतवणूक करण्याचे कंपनीकडून निश्चित करण्यात आले आहे. नव्या धोरणाअंतर्गत कंपनी चिपच्या जगभरातील वाढत्या मागणीचा विचार करून येणाऱया काळात चिपच्या उत्पादन क्षमतेत वाढ करणार आहे. त्याकरीता 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे. अरिझोनातील दोन कारखान्यांमध्ये चिप उत्पादनात वाढ केली जाईल. डिझाइन आणि उत्पादनात लागणारा चिप हा महत्त्वाचा घटक असल्याचे लक्षात घेऊन उत्पादनात वाढ केली जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. नव्या धोरणानुसार इतर कंपन्यांकरीताही कंपनी चिप निर्मिती करणार असल्याचे सांगण्यात येते.









